जसप्रीत बुमराहचे अव्वल स्थान ट्रेंट बोल्टने हिसकावले

आयसीसी वन-डे गोलंदाज क्रमवारीत पहिल्या स्थानाबरोबरच आणखी दोन बदल झाले.
जसप्रीत बुमराहचे अव्वल स्थान ट्रेंट बोल्टने हिसकावले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या वन-डे क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे अव्वल स्थान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हिसकावून घेतले. बोल्टने ७०४ गुण मिळविले, तर बुमराहचे ७०३ गुण झाले.

आयसीसी वन-डे गोलंदाज क्रमवारीत पहिल्या स्थानाबरोबरच आणखी दोन बदल झाले. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी एका स्थानाने वर आला. आता तो आठव्या क्रमांकावर आला. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता नवव्या क्रमांकावर घसरला. वोक्सला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही नुकसान झाले. वोक्स आता सहाव्या; तर कॉलिन डी ग्रँडहोमी पाचव्या स्थानी पोहोचला.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फॉर्म गमावलेल्या विराट कोहलीची क्रमवारीत पुन्हा घसरण झाली. त्याची क्रमवारीत आणखी एका स्थानाची घसरण झाली. तो आता चौथ्या क्रमांकावर आला. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकही दोन स्थान घसरून सहाव्या स्थानावर आला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रस्सी वॅन डुसेनने तीन स्थानांची उसळी घेत तिसरे स्थान पटकाविले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in