अफगाणिस्तान-श्रीलंका कसोटी-श्रीलंकेच्या विजयात जयसूर्या चमकला

डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने (१०७ धावांत ५ बळी) दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानला १० गडी राखून नामोहरम केले
अफगाणिस्तान-श्रीलंका कसोटी-श्रीलंकेच्या विजयात जयसूर्या चमकला

कोलंबो : डावखुरा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने (१०७ धावांत ५ बळी) दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानला १० गडी राखून नामोहरम केले. अफगाणिस्तानने दिलेले ५६ धावांचे माफक लक्ष्य दिमुथ करुणारत्ने (नाबाद ३२) व निशान मदुश्का (नाबाद २२) या सलामीवीरांनी ७.२ षटकांतच गाठून श्रीलंकेचा विजय साकारला.

जयसूर्यापुढे अफगाणिस्तानचा दुसरा डाव २९६ धावांत आटोपला. इब्राहिम झादरानने ११४ धावांची खेळी साकारली. मात्र पहिल्या डावात श्रीलंकेने २४१ धावांची आघाडी घेतली होती. तीच त्यांच्यासाठी निर्णायक ठरली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in