जिकडे तिकडे चहूकडे चर्चा जेमिमाच्या किमयाची

भारताने महिला क्रिकेटच्या इतिहासातील विक्रमी धावसंख्येचा पाठलागही केला. या विजयानंतर सगळीकडे जेमिमाच्याच किमयाची चर्चा सुरू आहे. मुंबईच्या या २५ वर्षीय खेळाडूने ८ वर्षांपूर्वी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आता ती विश्वविजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. त्यामुळे अवघ्या विश्वाचे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लक्ष असेल.
जिकडे तिकडे चहूकडे चर्चा जेमिमाच्या किमयाची
जिकडे तिकडे चहूकडे चर्चा जेमिमाच्या किमयाचीPhoto : X
Published on

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने गुरुवारी ऐतिहासिक पराक्रम केला. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (१३४ चेंडूंत नाबाद १२७ धावा) साकारलेल्या झुंजार शतकाला कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (८८ चेंडूंत ८९ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय संघाने बलाढ्य व गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५ गडी आणि ९ चेंडू राखून पराभव करत महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

भारताने महिला क्रिकेटच्या इतिहासातील विक्रमी धावसंख्येचा पाठलागही केला. या विजयानंतर सगळीकडे जेमिमाच्याच किमयाची चर्चा सुरू आहे. मुंबईच्या या २५ वर्षीय खेळाडूने ८ वर्षांपूर्वी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आता ती विश्वविजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. त्यामुळे अवघ्या विश्वाचे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लक्ष असेल.

“प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण काळ येतो. देवाने या काळात मला मानसिक स्थैर्य दिले. त्यामुळेच मी ही खेळू साकारू शकली. माझ्या कुटुंबियांनी, प्रशिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवणे कधीच थांबवले नाही. विश्वचषकात सुरुवातीला संघर्ष करूनही संघात स्थान मिळाल्यानंतर स्वत:ला सिद्ध केल्याचे समाधान आहे,” असे जेमिमा म्हणाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३८ धावांचे लक्ष्य भारताने ४८.३ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. १४ चौकारांच्या साथीने जेमिमाने १३४ चेंडूंत १२७ धावा फटकावताना कारकीर्दीतील तिसरे शतक साकारले. तिला २-३ वेळा जीवदानही लाभले. हरमनसह तिने तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी रचून पायाभरणी केली. मग दीप्ती शर्मा (१७ चेंडूंत २४) व रिचा घोष (१६ चेंडूंत २६) यांनी उपयुक्त योगदान दिले. अखेरीस अमनजोत कौरने (८ चेंडूंत नाबाद १५) ४९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयी चौकार लगावला आणि सर्वांनी जल्लोष केला. जेमिमाला यावेळी अश्रू अनावर झाले.

logo
marathi.freepressjournal.in