पॅरिस ऑलिम्पिकसाठी जेरेमीची अचिंताशी झुंज

ऑलिम्पिकच्या नियमानुसार कोणत्याही वजनी गटात ‘एका देशाचा एकच खेळाडू’ हे सूत्र अवलंबण्यात येते
 पॅरिस ऑलिम्पिकसाठी जेरेमीची अचिंताशी झुंज

जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शेऊली या दोन्ही वेटलिफ्टिंगपटूंनी नुकताच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकांची कमाई केली. परंतु २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेरेमीचा ६७ किलो वजनी गट नसल्याने तो वजन वाढवून ७३ किलो गटात सहभागी होण्यासाठी दावेदारी पेश करणार आहे.

ऑलिम्पिकच्या नियमानुसार कोणत्याही वजनी गटात ‘एका देशाचा एकच खेळाडू’ हे सूत्र अवलंबण्यात येते. त्यामुळे राष्ट्रकुलमध्ये ७३ किलो गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या शेऊलीलाच या गटासाठी प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र १९ वर्षीय जेरेमीला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी वजनी गट बदलणे गरजेचे असल्याने तो आता ७३ किलो गटासाठी शेऊलीविरुद्ध लढा देईल. भारताच्या दृष्टीकोनाने दोघांमध्येही पदक मिळवण्याची क्षमता असली तरी दोघांपैकी नेमका कोण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जेरेमी गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिकेत तंदुरुस्ती शिबिरात मेहनत घेत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in