झुलन गोस्वामीचा क्रिकेटला अलविदा ;ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शेवटचा सामना खेळणार

भारतीय संघाची वाटचाल आणि भविष्यासाठी तयारी करण्याबाबत निवडकर्त्यांनी झुलनशी चर्चा केल्याचे वृत्त आहे
 झुलन गोस्वामीचा क्रिकेटला अलविदा ;ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शेवटचा सामना खेळणार

‘चकडा एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली झुलन गोस्वामी क्रिकेटला अलविदा करणार असून ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शेवटचा सामना खेळणार आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड दौऱ्यात झुलन गोस्वामी निवृत्ती घेणार आहे. बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटमधील तिच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार झुलन गोस्वामी लॉर्ड्सवर तिचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल. भारतीय संघाची वाटचाल आणि भविष्यासाठी तयारी करण्याबाबत निवडकर्त्यांनी झुलनशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.

१० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात तीन टी-२० सामने आणि त्यानंतर तीन सामन्यांची वन-डे मालिका नियोजित आहे. एकदिवसीय मालिकेला १८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. हाच सामना झुलन गोस्वामीच्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. झुलनने २००२ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी योगदान दिले. तिने १२ कसोटी, २०१ वन-डे आणि ६८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ३५२ विकेट्स घेतले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in