FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी अंबानींच्या जिओने मागितली माफी; जाणून घ्या कारण...

भारतामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक हा ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या ‘जिओ’ सिनेमा मोफत पाहायला मिळणार असल्याने भारतीय फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
FIFA World Cup : फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी अंबानींच्या जिओने मागितली माफी; जाणून घ्या कारण...
Published on

फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ला दमदार सुरुवात झाली. कतारमधील अल बायत स्टेडियममध्ये या विश्वचषकाचा पहिला सामना झाला. या सामन्यात इक्वेडोरने २-०च्या फरकाने यजमान कतारला पराभूत केले. विशेष म्हणजे, भारतामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक हा ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या ‘जिओ’ सिनेमा मोफत पाहायला मिळणार असल्याने भारतीय फुटबॉल प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच, वेबसाईटवरही हा सामना मोफत दाखवण्यात आला. मात्र, मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी या अ‍ॅप आणि वेबसाईटचा वापर केल्याने लाइव्ह स्ट्रीमींगचा दर्जा तर घसरलाच. शिवाय, अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर सोशल मीडियावर फुटबॉल प्रेमींचा आक्रोश पाहायला मिळाला.

अनेक चाहत्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. अगदी वेगवान इंटरनेट असलेल्या वापरकर्त्यांनाही हा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे फिफा विश्वचषक पाहणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं. या सगळ्याचा आढावा घेऊन अखेर जिओने अखेर ट्विटरवर माफी मागितली. त्यांनी ट्विटरवर, "प्रिय जिओसिनेमा चाहत्यांनो, तुम्हाला सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. तुम्ही तुमचं अ‍ॅप अपडेट करुन फिफा विश्वचषक कतार २०२२ चा आनंद गेऊ शकता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व." असे ट्विट करत फुटबॉलप्रेमींची माफी मागितली.

logo
marathi.freepressjournal.in