के. एल. राहुलची शस्त्रक्रिया यशस्वी ; लवकरच करणार संघात पुनरागमन

लोकेश राहुलच्या पोस्टवर सासरे सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुलची पत्नी अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर
के. एल. राहुलची शस्त्रक्रिया यशस्वी ; लवकरच करणार संघात पुनरागमन

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज केएल राहुलच्या उजव्या मांडीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लोकेश राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. आता भारतीय संघात पुनरागमन करण्याचा आपला निर्धार असल्याचं त्याने म्हटलं आहे. दरम्यान, लोकेश राहुलच्या पोस्टवर त्यांचे सासरे सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुलची पत्नी अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे.

लोकेश राहुल आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व करत होता. दरम्यान, बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान राहुलला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे लोकेश राहुलला उर्वरित आयपीएल आणि जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलला मुकावे लागणार आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात केएल राहुलच्या जागी इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ७ ते १२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in