केन विल्यम्सन एकदिवसीय विश्वचषकाला मुकण्याची शक्यता ; उजव्या पायावर शस्त्रक्रिया

गुजरात जायंट्स संघाकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान विल्यम्सनला दुखापत
केन विल्यम्सन एकदिवसीय विश्वचषकाला मुकण्याची शक्यता ; उजव्या पायावर शस्त्रक्रिया

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन पायाच्या दुखापतीमुळे चक्क एकदिवसीय विश्वचषकाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या आयपीएलच्या सलामीच्याच लढतीत गुजरात जायंट्स संघाकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान विल्यम्सनला दुखापत झाली.

या दुखापतीमुळे विल्यम्सन मायदेशी रवाना झाला असून त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामधून पूर्णपणे सावरण्यासाठी विल्यम्सनला सहा महिन्यांचा अवधी लागू शकतो. अशा स्थितीत भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनीच याविषयी माहिती दिली.

“विल्यम्सनच्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर आहे. तसेच न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचा तंदुरुस्तीचा कार्यक्रम पाहता त्याला ऑक्टोबरपूर्वी १०० टक्के मैदानात परतणे आव्हानात्मक असेल. विल्यम्सन या खेळाडूऐवजी अन्य पर्याय नक्कीच मिळू शकेल. परंतु कर्णधार म्हणून संघासाठी तो आणखी मौल्यवान आहे,” असे विल्यम्सन म्हणाला. विल्यम्सनने मात्र तोपर्यंत आपण संघाला कोणत्याही प्रकारचे सहाय्य करण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात विल्यम्सनच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सप्टेंबर अखेरपर्यंत तो पूर्ण फीट होऊन मैदानात परतणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in