
कॅटरबरी : करुण नायरने शानदार दुहेरी शतक झळकावत इंग्लंड लायन्सविरुद्धच्या चार दिवसांच्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारत 'अ' संघाला ५५७ धावांचा डोंगर उभारून दिला. करुणने २८१ चेंडूंत २०४ धावा झळकावल्या.
करुणने दुसऱ्या दिवसाचा खेळ त्याच्या १८६ धावांवरून सुरू केला. वेगवान गोलंदाज इडी जॅकला कव्हर्सला चौकार लगावत करुणने आपले दुहेरी शतक २७२ धावांत पूर्ण केले. त्याआधी भारताने ध्रुव जुरेल (९४ धावा) आणि नितीश कुमार रेड्डी (७ धावा) या दोन विकेट झटपट गमावल्या होत्या. करुण आणि ध्रुव या जोडीने चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली.
दुहेरी शतक झळकावल्यानंतर करुणला फार काळ मैदानात थांबता आले नाही. झमन 'अख्तरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जेम्स रीव्हकडे झेल देत तो माघारी परतला.
२७ धावांची झटपट खेळी खेळल्यानंतर अख्तरने शार्दुललाही बाद केले. दिवसाच्या पहिल्या सत्रात लायन्सने ४ फलंदाजांना माघारी धाडले. भारताच्या सरफराज खानने ९२ धावांची उपयुक्त खेळी खेळली. भारत 'अ' संघाचा पहिला डाव ५५७ धावांवर सर्वबाद झाला होता.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंड लायन्सने १८ षटकांत ७५ ' धावावर १ फलंदाज गमावला गर होता. अंशुल कंबोजने बेन ८१ मॅककिन्नीचा त्रिफळा उडवत लायन्सची सलामीची जोडी फोडली होती. टॉम हेन्स नाबाद २५ आणि इमिलियो गे नाबाद २८ धावांवर खेळत होते.
मॅककिन्नीला वेगवान अंशुल ७२ कंबोजने आपल्या सापळ्यात आधी अडकवले. कंबोजने प्रभावी गोलंदाजी केली. अचूक टप्पा आणि स्विंग यांचा त्याने चांगला उपयोग केला.
तत्पूर्वी भारताने शानदार १९५ फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. पहिल्या दिवस भारताच्या फलंदाजांनी गाजवला. सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दुकलीचे शतक हुकले. करुण नायर मात्र लायन्ससाठी कर्दनकाळ माघारी ठरला.
इंग्लंडच्या जोश हुल आणि झमन अख्तर यांनी प्रत्येकी ३ फलंदाजांना माघारी धाडले. एडी जॅकने २ फलंदाजांना आपल्या सापळ्यात अडकवले. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारत अ संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.