
बेकनहॅम : भारतीय संघात दुसऱ्यांदा संधी मिळणे कठीण असते. मात्र करुण नायर भाग्यवान आहे. त्याला पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीमुळे खूपच खास वाटत असल्याच्या भावना नायरने व्यक्त केल्या.
भारतीय संघात पुन्हा संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आठ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केलेल्या नायरने नमूद केले.
नायरच्या पुनरागमनाबाबत बोलताना मुख्य प्रशिक्षक गंभीर यांनीही त्याचे कौतुक केले. कमबॅक करणे कधीच सोपे नसते. त्याने जमवलेल्या धावा आणि कधीही हार न मानण्याचा दृष्टिकोन हे प्रेरणादायी असल्याचे गंभीर म्हणाले होते.
माझ्या मनात काय भावना असतील हे मी आत्ताच सांगू शकत नाही. पण निश्चितच जेव्हा मी भारतीय जर्सीत मैदानात उतरेन तो माझ्यासाठी स्वप्नवत क्षण असेल, असे नायर म्हणाला.