शिवनेरी मंडळाची जेतेपदाची हॅट्‌ट्रिक; खो-खो मध्ये महिलांच्या, १७ आणि १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अजिंक्य

पुरुषांच्या गटात एमपीएल संघाने बाजी मारली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ओम साईश्वरने श्री समर्थ मंदिराला ९-५ अशी धूळ चारली.
शिवनेरी मंडळाची जेतेपदाची हॅट्‌ट्रिक; खो-खो मध्ये महिलांच्या, १७ आणि १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अजिंक्य

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेत खो-खो प्रकारातील महिलांच्या, १७ आणि १४ वर्षांखालील मुलींच्या अशा एकंदर तीन गटांत शिवनेरी सेवा मंडळाने विजेतेपद काबिज केले.

पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या क्रीडा महाकुंभात महिलांच्या खो-खो सामन्यात शिवनेरीने अमर हिंद मंडळाचा ५-३ असा एक डाव व २ गुणांच्या फरकाने पराभव केला. आरुषी गुप्ता (४ मिनिटे संरक्षण), मुस्कान शेख (३.१० मि.) आणि कशिश पाटेकर (आक्रमणात ३ गडी) यांनी शिवनेरीसाठी मोलाचे योगदान दिले. अमर हिंदकडून प्रांजळ पाताडेने चांगला खेळ केला.

१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात शिवनेरीने ओम साईश्वर मंडळावर ३-१ अशी दोन गुणांनी मात केली. मुस्कान (नाबाद ५ मि.) आणि सिद्धी शिंदे (३.२० मि.) यांनी दणदणीत संरक्षण केले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात शिवनेरीने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा ९-६ असा १ डाव व ३ गुणांनी धुव्वा उडवला. आरुषी (४.२० मि.), स्वरा शिंदे (२.१० मि.) आणि संस्कृती कदम (३ गडी) यांनी उल्लेखनीय खेळ केला.

पुरुषांच्या गटात एमपीएल संघाने बाजी मारली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ओम साईश्वरने श्री समर्थ मंदिराला ९-५ अशी धूळ चारली. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ओम साईश्वरनेच विजेतेपद पटकावताना सरस्वती स्पोर्ट्स क्लबवर ८-६ असा विजय मिळवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in