सामन्यात हार, प्रेमात विजयी ; किंचित शाहने सामना संपल्यानंतर केलं प्रपोज

तिनेही लगेगच किंचितला होकार दिला. किंचितच्या या अनोख्या प्रपोजमुळे हा सामना चांगलाच अविस्मरणीय ठरला
सामन्यात हार, प्रेमात विजयी ;  किंचित शाहने सामना संपल्यानंतर केलं प्रपोज

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषकात भारताविरुद्धच्या लढतीत हाँगकाँगला पराभव पत्करावा लागला असला तरी याच संघातील किंचित शाह या खेळाडूने त्याच्या प्रेमाला मात्र जिंकले आहे. त्याने हा सामना झाल्यानंतर स्टेडियममध्येच आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. विशेष म्हणजे किंचितला त्याच्या प्रेयसीने होकारदेखील दिला. किंचितने त्याच्या प्रेयसीला सामना संपल्यानंतर प्रपोज केलं. विशेष म्हणजे या प्रपोजनंतर प्रेयसीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. तिनेही लगेगच किंचितला होकार दिला. किंचितच्या या अनोख्या प्रपोजमुळे हा सामना चांगलाच अविस्मरणीय ठरला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in