मुंबईकर शार्दुलची केकेआरसाठी धमाकेदार फलंदाजी; आरसीबीवर मिळवला विजय

मुंबईकर शार्दुलची केकेआरसाठी धमाकेदार फलंदाजी; आरसीबीवर मिळवला विजय

मुंबईकर शार्दूल ठाकूरने अवघ्या २९ चेंडूंत फटकावलेल्या ६८ धावांच्या केकेआरला आरसीबीविरोध विजय मिळवून दिला

मुंबईकर शार्दूल ठाकूरने अवघ्या २९ चेंडूंत फटकावलेल्या ६८ धावांच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीवीर रहमनुल्ला गुरबाझनेसुद्धा ४४ चेंडूंत ५७ धावांची खेळी साकारली. केकेआरने आरसीबीचा तब्बल ८१ धावांनी धुव्वा उडवला. केकेआरचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला, तर आरसीबीला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फॅफ ड्यूप्लेसिसने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले. वेंकटेश अय्यर (३) स्वस्तात बाद झाल्यावर मंदीप सिंग (०) भोपळाही फोडू शकला नाही. डेव्हिड विलीने या दोघांना बाद केले. त्यानंतर गुरबाझने एकाकी झुंज देत संघाला पॉवरप्लेपर्यंत अर्धशतकाचा टप्पा गाठून दिला. कर्णधार नितीश राणा (१) यावेळीही छाप पाडू शकला नाही.

त्यानंतर कर्ण शर्माने लागोपाठच्या चेंडूवर गुरबाझ आणि धोकादायक आंद्रे रसेल (०) यांना माघारी पाठवून कोलकाताची अवस्था ११.३ षटकांत ५ बाद ८९ अशी केली. येथून मग रिंकू सिंग आणि शार्दूलची जोडी जमली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी अवघ्या ४५ चेंडूंत १०३ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. शार्दूलने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक झळकावताना नऊ चौकार व तीन षटकारांची आतषबाजी केली. रिंकूने ३३ चेंडूंत ४६ धावा करताना दोन चौकार व तीन षटकार लगावले. दोघेही अनुक्रमे १९ व २०व्या षटकात बाद झाले. उमेश यादवने षटकार लगावून कोलकाताला २० षटकांत ७ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारून दिली. कोलकाताकडून विली आणि कर्ण यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूचा डाव १७.४ षटकांत १२३ धावांत आटोपला. विराट कोहली (२१), ड्यूप्लेसिस (२३) फिरकीपुढे अपयशी ठरले.

शार्दूल ठाकूरने आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारतानाच यंदाच्या हंगामात २० चेंडूंत अर्धशतक साकारणारा दुसरा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. राजस्थानच्या जोस बटलरनेसुद्धा हैदराबादविरुद्ध २० चेंडूंत ५० धावा फटकावल्या होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in