केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनसुद्धा बाहेर

बीसीसीआयने क्रिकबझला सांगितले की, राहुलला उपचारासाठी जर्मनीला पाठवले जाईल
केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनसुद्धा बाहेर
ANI
Published on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) केएल राहुलला उपचारासाठी जर्मनीला पाठवत आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे त्याला एकूण 7 सामने खेळायचे आहेत. केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. याआधी राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतूनही बाहेर गेला आहे. 

बीसीसीआयने क्रिकबझला सांगितले की, राहुलला उपचारासाठी जर्मनीला पाठवले जाईल. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला राहुल जर्मनीला रवाना होणार आहे. राहुलचे इंग्लंड दौऱ्यावर न जाणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. 

भारतीय संघ इंग्लंडमध्ये ७ सामने खेळणार आहे

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ एकूण 7 सामने खेळणार आहे. यामध्ये 1 टेस्ट मॅच, 3 T20 आणि 3 ODI मॅचचा समावेश आहे. संघ १ जुलैपासून इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in