आनंदात, दु:खात सहभागी होणाऱ्यांना ओळखा; कोहलीच्या पोस्टची सर्वत्र चर्चा

आशयाचे कोहलीने पत्रकार परिषदेत केलेले विधान हे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याविषयी होते
आनंदात, दु:खात सहभागी होणाऱ्यांना ओळखा; कोहलीच्या पोस्टची सर्वत्र चर्चा

“जे लोक तुमच्या आनंदात आनंदी आणि तुमच्या दु:खात दु:खी असतात त्यांना ओळखा. हे लोक तुमच्या हृदयात विशेष स्थान मिळण्याच्या पात्रतेचे असतात,” असे भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे. शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये त्याने कोणत्या लोकांना हृदयात स्थान दिले जावे, याबाबत मत व्यक्त केले. कोहलीच्या नव्या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान, जाहीर बोलण्याऐवजी माझ्याशी प्रत्यक्ष बोलावे, अशा आशयाचे कोहलीने पत्रकार परिषदेत केलेले विधान हे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याविषयी होते, असे म्हटले जात आहे. “मला २० मिनिटे कोहलीला मार्गदर्शन करता आले, तर फलंदाजीत कोणते बदल करावेत हे मी त्याला सांगू शकेन,” असे गावसकर एका मुलाखतीत म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in