हायव्होल्टेज सामन्यासाठी कोहलीची 'हाय अल्टिट्यूड मास्क’ घालून विशेष तयारी

इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने निवड समितीकडे विश्रांतीची मागणी केली होती.
 हायव्होल्टेज सामन्यासाठी कोहलीची 'हाय अल्टिट्यूड मास्क’ घालून विशेष तयारी

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यासाठी भारताचा विराट कोहली ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ मास्क घालून विशेष तयारी केली आहे. विराटचा ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ घालून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहली खास अंदाजात सराव करताना दिसला. विराट कोहली एक महिन्याच्या ब्रेकनंतर आशिया कपमध्ये पुनरागमन करीत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने निवड समितीकडे विश्रांतीची मागणी केली होती. आशिया कपमध्ये पुनरागमन केल्यानंतर कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली; तर हाँगकाँगविरुद्ध त्याने अर्धशतक झळकाविले.

फुप्फुसाची क्षमता वाढविणारा मास्क

अल्टिट्यूड मास्क’मुळे फुप्फुसाची क्षमता वाढवण्यास आणि ती सुधारण्यास मदत हाेते. त्यामुळे स्टॅमिना सुधारतो. यूएईच्या कडक उन्हात हे प्रशिक्षण कोहलीला मैदानावरील इतर खेळाडूंच्या तुलनेत ताजेतवाने ठेवण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे. कोहलीने त्याचे नेट सेशन संपवून हा सर्व केला. व्हिडीओमध्ये तो सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली हे ट्रेनिंग करताना दिसतो. या दरम्यान तो स्वतःच्या वेळेकडे स्वतः लक्ष देत असल्याचे दिसून येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in