कोल्हापूरच्या सिकंदरने पटकावला जनसुराज्य शक्ती श्री कुस्ती किताब ;वारणेच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात लाखो क्रीडाप्रेमींची उपस्थिती

रात्री १० वाजता प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी सिकंदर विरुद्ध मोनू यांच्यात लढत झाली.
कोल्हापूरच्या सिकंदरने पटकावला जनसुराज्य शक्ती श्री कुस्ती किताब ;वारणेच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात लाखो क्रीडाप्रेमींची उपस्थिती
PM

मुंबई : लाखों कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने दिल्लीच्या मोनू दहियाला निकाली डावावर अवघ्या सातव्या मिनिटात चीतपट करत प्रथम क्रमांकाचा ‘जनसुराज्य शक्ती श्री’ कुस्ती किताब पटकावला. वारणेत झालेल्या भारत विरुद्ध इराण यांच्यातील संघर्षात भारताच्या मल्लांनी विजय मिळवून मैदान गाजवले.

वारणा समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांच्या २९व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणा विद्यालयाच्या भव्य पटांगणावर भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय ‘विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम’ लाखो कुस्तीशौकीनांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. या मैदानात प्रमुख ११ ‘शक्ती श्री’ किताबासह ३५ पुरस्कृत कुस्त्या रंगल्या. रात्री १० वाजता प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी सिकंदर विरुद्ध मोनू यांच्यात लढत झाली. सिकंदरने सहाव्या मिनिटाला एकचाक डावावर मोनूची पकड घेतली व या पकडीमध्ये सिकंदर यशस्वी झाला. सातव्या मिनिटाला कुस्तीचा निकाल लागला.

‘वारणा साखर शक्ती श्री’ मानाची लढत अमन बनिया  (जम्मू काश्मीर )  विरुद्ध अहमद मिर्झा (इराण) यांच्यात झाली. अहमद मिरझा याने मोळी डावावर अमनला चीतपट केले. ‘वारणा दूध संघ शक्ती श्री’ लढत पृथ्वीराज पाटील आणि पंजाबचा लालीमांज लुधियाना यांच्यात झाली. यामध्ये पृथ्वीराजने उलटी डावावर लालीमांडला पराभूत केले. यावेळी महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदरचा आयोजकांतर्फे विशेष गौरवही करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in