लक्ष्य, किरणची विजयी सलामी; प्रणॉय, श्रीकांत सलामीला गारद ; इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताच्या लक्ष्य सेन आणि किरण जॉर्ज यांनी बुधवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. मात्र एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.
लक्ष्य, किरणची विजयी सलामी; प्रणॉय, श्रीकांत सलामीला गारद ; इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

जकार्ता : भारताच्या लक्ष्य सेन आणि किरण जॉर्ज यांनी बुधवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. मात्र एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.

५०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने चीनच्या वेंग होंगला २४-२२, २१-१५ असे नमवले. २३ वर्षीय किरणने फ्रान्सच्या टोमा पोपोव्हवर १८-२१, २१-१६, २१-१९ असा पिछाडीवरून विजय मिळवला. लक्ष्यसमोर आता डेन्मार्कच्या आंद्रे आन्टोसेनचे आव्हान असेल, तर किरणची गाठ चीनच्या लू गुआंग झूशी पडेल.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या प्रणॉयला मात्र सिंगापूरच्या लोह किन यूकडून १८-२१, २१-१९, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच मलेशियाच्या ली झी जिआने श्रीकांतवर १९-२१, २१-१४, २१-११ अशी मात केली. श्रीकांत सलग दुसऱ्या स्पर्धेत सलामीलाच गारद झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in