भारताप्रमाणेच आफ्रिकेतही मुंबई इंडियन्सचा बोलबाला होणार;टी-२० लीगसाठी रशिद खानसह पाच खेळाडू करारबध्द

मुंबई इंडियन्सने युएई आणि दक्षिण आफ्रिका या दोन टी-२० लीगसाठी संघ विकत घेतले आहेत
भारताप्रमाणेच आफ्रिकेतही मुंबई इंडियन्सचा बोलबाला होणार;टी-२० लीगसाठी रशिद खानसह पाच खेळाडू करारबध्द

मुंबई इंडियन्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगसाठी विकत घेतलेल्या संघात पाच खेळाडूंना समाविष्ट करून घेतले. त्यांना करारबद्ध केले. या खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानच्या रशिद खानचा समावेश आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या लिआम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताप्रमाणेच आफ्रिकेतही मुंबई इंडियन्सचा बोलबाला होणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई इंडियन्सने युएई आणि दक्षिण आफ्रिका या दोन टी-२० लीगसाठी संघ विकत घेतले आहेत. युएईच्या लीगसाठी फ्रँचायझीचे नाव ‘एमआय अमिरात’ असे असेल, तर दक्षिण आफ्रिका लीगमध्ये 'एमआय केपटाऊन' असे राहील. हे दोन्ही संघ आयपीएलमधील मुंबई इंडियन्स फ्रँचायझीप्रमाणेच जर्सी घालतील.

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "युएई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधील फ्रँचायझींची नावे तेथील विशिष्ट प्रदेशांना लक्षात घेऊन ठेवण्यात आली आहेत." निवेदनात पुढे म्हटले आहे की, "नवीन संघ मुंबई इंडियन्ससारखे असतील. एका परिवाराचा ते जागतिक विस्तार करतील आणि लीगची मूल्ये ते नक्कीच पुढे नेईल, त्यामुळे मुंबई इंडियन्सला फ्रँचायझीला क्रिकेट विश्वात जास्त प्रेम आणि सन्मान मिळेल."

खेळाडू वापरणार आयपीएलची जर्सी

मुंबई इंडियन्सने तीन संघ विविध टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. या संघांच्या नावात बदल असला तरी त्यांची जर्सी मात्र सारखीच असणार आहे. आयपीएलमधील खेळाडू यावेळी संघात कायम राहतील की नाही, याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार की नाही, याची उत्सुकता आता सर्वांना असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in