कुणाच्याही कृपेने नाही, मेहनतीमुळे यशस्वी : मेस्सी

अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. अनेकदा अपयशी ठरल्यानंतरही सातत्याने केलेल्या मेहनतीमुळे आम्ही इथवर मजल मारली आहे. आम्हाला काहीही फुकट मिळालेले नाही, असे सांगत मेस्सीने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कुणाच्याही कृपेने नाही, मेहनतीमुळे यशस्वी : मेस्सी
कुणाच्याही कृपेने नाही, मेहनतीमुळे यशस्वी : मेस्सीPhoto- X
Published on

अटलांटा : अर्जेंटिनाचा तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. अनेकदा अपयशी ठरल्यानंतरही सातत्याने केलेल्या मेहनतीमुळे आम्ही इथवर मजल मारली आहे. आम्हाला काहीही फुकट मिळालेले नाही, असे सांगत मेस्सीने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) अर्जेंटिनाला झुकते माप दिले जात असल्याची आणि रेफ्रीकडूनही अर्जेंटिनाविरोधात फारसे निर्णय न दिले जाण्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू असते. याविषयी पत्रकार परिषदेत विचारले असता मेस्सीने स्पष्ट मत मांडले. अर्जेंटिनाच्या संघाचे शुक्रवारी सायंकाळी अंतिम सामन्यासाठी न्यू जर्सी येथे आगमन झाले.

“सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत पिछाडीवरून पुनरागमन करण्याची संघाची क्षमता ही विश्वविजेत्या संघाची मानसिकता दाखवून देते. आम्ही इंग्लंडविरुद्ध पराभूत झालो असतो, तर हेच टीकाकार आमची हुर्यो उडवताना दिसले असते. सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणे सोपे नसते,” असे मेस्सी म्हणाला. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ८५व्या मिनिटांपर्यंत ०-१ने पिछाडीवर असलेल्या अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी मध्यरात्री होणाऱ्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होणार आहे.

“कोणाला आवडेल किंवा नाही, पण आम्ही गेल्या चार वर्षांत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आम्ही जगातील अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवले असून हे सिद्ध करते की आमची कामगिरी कोणताही योगायोग नाही आणि आम्हाला काहीही फुकट मिळालेले नाही,” असे मेस्सीने नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in