World Boxing Championship : २ दिवसांत ४ सुवर्ण पदके; लवलीनाचीही सुवर्ण कामगिरी

भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने जिंकले सुवर्णपदक, (World Boxing Championship) २ दिवसांत भारताच्या नावावर ४ सुवर्ण पदके
World Boxing Championship : २ दिवसांत ४ सुवर्ण पदके; लवलीनाचीही सुवर्ण कामगिरी
Published on

नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत (World Boxing Championship) भारताने २ दिवसात ४ सुवर्ण पदके आपल्या नावावर केली आहेत. भारतीय महिला बॉक्सर्सने ही कामगिरी केली असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. आज लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) ७५ किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी आजच ५० किलो वजनी गटामध्ये निखत झरीनने सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या लवलीनाने या स्पर्धेत ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करसोबत होता.

या अंतिम सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाच्या पार्करचा ५ - २ असा पराभव केला. यावेळी तिने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, शनिवारी स्वीटी बुरा आणि नीतू घंघास यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

logo
marathi.freepressjournal.in