मेसीची चमक; पीएसजी विजयी

मेसीने पाचव्याच मिनिटाला नोंदवलेला गोल पीएसजीच्या विजयासाठी पुरेसा ठरला.
मेसीची चमक; पीएसजी विजयी

विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेनने रविवारी मध्यरात्री लीग-१ चषक फुटबॉल स्पर्धेत लियॉन संघावर १-० अशी मात केली. मेसीने पाचव्याच मिनिटाला नोंदवलेला गोल पीएसजीच्या विजयासाठी पुरेसा ठरला. मेसीने यंदाच्या हंगामातील सहावा गोल नोंदवला. या विजयासह पीएसजीने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखले.

दरम्यान, ला लिगामध्ये रेयाल माद्रिदने अॅटलेटिको माद्रिदला २-१ असे नमवले. रॉड्रिगोने १८व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला, फेड्रिको वॅलवरेडने ३६व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. सहा सामन्यांतील सलग सहाव्या विजयासह रेयालने १८ गुणांसह गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in