राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र,दिल्ली, ओदिशा विजयस्थानावर

साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी हरयाणावर मात करत विजयी घोडदौड कायम
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र,दिल्ली, ओदिशा विजयस्थानावर

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच्या सत्रात साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी हरयाणावर मात करत विजयी घोडदौड कायम ठेवली.

सकाळच्या सत्रातील अन्य लढतीत दिल्ली, ओदिशा संघानेही विजय मिळवला. कालच्या दिवसात मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने तेलंगणाचा व मुलींच्या सामन्यात तामिळनाडूचा परभव करत विजयी सलामी दिली. त्याच बरोबर मुलांच्या गटात दिल्लीने आंध्र प्रदेशचा, ओदिशाने छत्तीसगडचा व प. बंगालने हरियाणाचा पराभव करत विजय मिळवला तर मुलींच्या गटात ओदिशाने राजस्थानचा, कर्नाटकने प. बंगालचा, पंजाबने हरयाणाचा पराभव केला.

महाराष्ट्राच्या मुलींनी हरयाणा संघावर ११-१० असा एक डाव १ गुणाने विजय मिळवला. पहिल्या आक्रमणात महाराष्ट्राने हरयाणाचे ११ गडी बाद केले. हरयाणाला आक्रमणात अवघे ५ गडी बाद करता आले. मध्यंतराला सहा गुणाची आघाडी असल्यामुळे हरयाणाला फॉलोऑन देण्यात आला. दुसऱ्या आक्रमणातही हरयाणाने पाच गडी बाद केले. यामध्ये विजयी महाराष्ट्र संघातर्फे अश्ि‍वनी शिंदेने ३ मिनिटे, नाबाद १:२० मि. संरक्षण व २ खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळ केला. तर श्‍वेता वाघने २:३०, १ मि. ३० सेकंद, संरक्षण करत १ खेळाडू तर संपदा मोरेने १:३०, २:३० मि. संरक्षण व २ खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. पराभूत हरयाणातर्फे स्विटीने १:३०, १:२० मि. संरक्षण करताना २ खेळाडू बाद केले. मिनूने १:५० मि. संरक्षण करताना २ खेळाडू बाद करून चांगली साथ दिली.

मुलांच्या गटात महाराष्ट्राने हरयाणाचा १५-११ असा १ डाव ४ गुणांनी पराभव केला. प्रथम आक्रमण करणाऱ्या महाराष्ट्राने हरयाणाचे १५ गडी बाद केले. यामध्ये सुफियान शेख आणि रोहन कोरेने धारदार आक्रमण करत प्रत्येकी ३ गडी बाद केले. किरण वसावेने २:३० मि; नरेंद्र कातकडेने २:४० मि. पळतीचा खेळ केल्यामुळे हरयाणाला ४ गडी बाद करता आले. मध्यंतराला ११ गुणांची आघाडी असल्यामुळे हरयाणाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही हरयाणाने सातच गडी बाद केल्यामुळे महाराष्ट्राने सहज विजय साजरा केला.

अन्य सामन्यांमध्ये मुलांच्या गटात दिल्लीने छत्तीसगडचा १ डाव ३ गुणांनी तर मुलींमध्ये ओदिशाने पश्ि‍चम बंगालवर ५ गुणांनी विजय मिळविला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in