महाराष्ट्राच्या मुलींची दुहेरी जेतेपदाला गवसणी; कोल्हापूर दोन्ही गटांत उपविजेता

मुंबईतील लालबाग येथील ओम साईश्वर सेवा मंडळ पेरू कंपाऊंड, मनोरंजन मैदानावर झालेल्या मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा ३४-१८ असा पराभव केला.
महाराष्ट्राच्या मुलींची दुहेरी जेतेपदाला गवसणी; कोल्हापूर दोन्ही गटांत उपविजेता

मुंबई : पश्चिम विभागिय खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत मुली आणि किशोरी अशा दोन्ही गटांत महाराष्ट्राच्या संघांनी कोल्हापूरवर सहज मात करत दुहेरी विजेतेपद पटकावले. मैथिली पवार आणि अश्विनी शिंदे या दोघींची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

मुंबईतील लालबाग येथील ओम साईश्वर सेवा मंडळ पेरू कंपाऊंड, मनोरंजन मैदानावर झालेल्या मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा ३४-१८ असा पराभव केला. महाराष्ट्र संघातर्फे सुहानी धोत्रे (२.१० मिनिटे संरक्षण आणि आक्रमणात ९ गडी), अश्विनी शिंदे (२.३० मि, ६ गडी), प्रणाली काळे (२.२० मि., २ गडी), स्नेहा लामकाणे (३ मि.) यांनी अफलातून कामगिरी केली. किशोरी गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने कोल्हापूरवर २०-१४ अशी मात केली. मैथिली पवार (३.३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात ८ गडी), धनश्री लव्हाळे (३ मि., ६ गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी नोंदवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in