महिला खेळाडूंसाठी सरकारचे महत्वाचे पाऊल; क्रीडांगणावर चेंजिंग रूम
महिला खेळाडूंसाठी सरकारचे महत्वाचे पाऊल; क्रीडांगणावर चेंजिंग रूम

महिला खेळाडूंसाठी सरकारचे महत्वाचे पाऊल; क्रीडांगणावर चेंजिंग रूम; महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश

राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
Published on

मुंबई : राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी दादर छत्रपती शिवाजी पार्क जिमखाना नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित व आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजे, त्यासाठी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे आवाहन केले होते. या भावनिक आवाहनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश

चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सुरक्षिततेसाठी मर्यादित क्षेत्रात सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या इमारती दुरुस्त करणे अथवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in