झहीर, प्रशांत, झैद, योगेश उपांत्य फेरीत

कर्नाटकच्या झहीरने महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणवर १४-९, १४-७ अशी मात केली
झहीर, प्रशांत, झैद, योगेश उपांत्य फेरीत

मुंबई : महाराष्ट्र स्काऊट हॉल, शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत योगेश धोंगडे, झहीर पाशा, प्रशांत मोरे व झैद अहमद यांनी उपांत्य फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत प्रशांत मोरेने महम्मद घुफ्रानवर १७-१, २४-६ असा सहज विजय मिळवला. महाराष्ट्राच्या झैद अहमदने महम्मद अन्सारीवर १९-६, २१-१० असे प्रभुत्व मिळवले. कर्नाटकच्या झहीरने महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणवर १४-९, १४-७ अशी मात केली, तर महाराष्ट्राच्या योगेश धोंगडेने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सागर वाघमारेला ९-८ २१-८ अशी धूळ चारली.

logo
marathi.freepressjournal.in