अखिल भारतीय स्नूकर ओपन स्पर्धेत महाराष्ट्राच्या या खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

महाराष्ट्राचा राज्य विजेता क्रीश गुरबक्षनी यानेही आरामात अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले
अखिल भारतीय स्नूकर ओपन स्पर्धेत महाराष्ट्राच्या या खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
Published on

राष्ट्रीय विजेता, महाराष्ट्राचा ईशप्रीत सिंग आणि राष्ट्रीय उपविजेता रेल्वेचा मलकित सिंग यांनी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एनएससीआय बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू झालेल्या स्पर्धेत गुरुवारी उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचा नंबर वन ईशप्रीत याने माजी राष्ट्रीय विजेता मनन चंद्रा याचे आव्हान ५-२(२४-१००, ८२-०, ३६-७४, ९५-०, ६३-८, ६४-१५, ११३-०) असे मोडीत काढले. दुसरीकडे, मलाकित याने जबरदस्त फॉर्म राखताना महाराष्ट्राच्या हसन बदामी याचा ५-०(७०-४२, ७२-१६, ८६-६, १००-१, ८९-७८) असा पराभव केला.

महाराष्ट्राचा राज्य विजेता क्रीश गुरबक्षनी यानेही आरामात अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्याने तामिळनाडूच्या विजय निंचानी याच्यावर ५-०(७४-३५, ६३-५३, ५९-५७, ७२-१६, ६९-६४) अशा फरकाने मात केली. ईशप्रीत आणि क्रीश यांनी आगेकूच केली तरी स्पर्श फेरवानी याला उपांत्यपूर्व फेरी गाठताना कडवी लढत द्यावी लागली. चंदिगडच्या रजत कनेजा याच्याविरुद्ध ४-३ अशा पिछाडीवरून खेळ उंचावत त्याने ५-४(४४-५८, ६०-४३, ९-१, ८-५०, ४३-५८, ६३-२७, ४६-६३ ७०-३९, ६२-९) असा निसटता विजय मिळवला.

संक्षिप्त निकाल

उपउपांत्यपूर्व फेरी - दिलीप कुमार (तामिळनाडू) विजयी वि. पुष्पेंदर सिंग (रेल्वे) ५-४(४-१८, ९२-३२, ४३-८१(४९), ३१-६, ४-९७(७६), ६-६४, ८३(५६)-५२, ५७-४५). सौरव कोठारी (पीएसपीबी) विजयी वि. शिवम अरोरा (बिहार) ५-३(७८(७०)-१२, ५७-१९, ३४-५८, ३-४०, ५-८१(६६), १०१(१०१)-० १५-६५(६४), ९८(८९)-२). लक्ष्मण तलवार (पीएसपीबी) विजयी वि. नितेश मदान (रेल्वे) ५-१ (७५(४४)७०(६४), ४-८४(७८), ७१(७०)-२४, ६५(४०)-०, ७४-४५, ७०-६१).

ब्रिजेश चावला (पीएसपीबी) विजयी वि. कमल चावला ५-२(६३(४४)-७, ७२३६, ३४(३-८६(५८), ६३-४७, ४७-७२(४५), ७३-३, ६९(३७)-३५(३४).

logo
marathi.freepressjournal.in