राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल - नामदेव शिरगावकर

महाराष्ट्र संघाच्या तयारीसंदर्भात विविध खेळांच्या राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल - नामदेव शिरगावकर

गुजरात येथे २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे ८०० जणांचे पथक अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या संघात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या तयारीसंदर्भात विविध खेळांच्या राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी शिरगावकर म्हणाले, “माझा संघ, माझी जबाबदारी हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक खेळाच्या संघटनांनी आपल्या खेळाडूंची उत्तम रीतीने तयारी करावी. खेळाडूंच्या तयारीसाठी राज्य शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न ठेवता संघटनांनी या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना अधिकाधिक पदके कशी मिळवता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे. ज्या संघटनांनी आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावे दिलेली नाहीत, त्यांनी लवकरात लवकर ही नावे सादर करावीत.”

या बैठकीत शिरगावकर यांनी यापूर्वी सुरू झालेल्या काही संघांच्या शिबिरांचा आणि संघ निवडीबाबत घेण्यात आलेल्या चाचण्यांचाही आढावा घेतला.

त्यावेळी खेळाडू व अन्य सपोर्ट स्टाफची यादी, प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य व सुविधा इत्यादी सर्व तपशील महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडे द्यावा, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in