महाराष्ट्राच्या महिलांना जेतेपद ;वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) बाजी

गुवाहाटी येथे ७५वी राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. महिला गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने विमानतळ प्राधिकरणाला ३-० अशी धूळ चारली.
महाराष्ट्राच्या महिलांना जेतेपद ;वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) बाजी
PM

गुवाहाटी : महाराष्ट्राने वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला सांघिक गटात विजेतेपद मिळवले. पुरुषांमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बाजी मारली.

गुवाहाटी येथे ७५वी राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. महिला गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने विमानतळ प्राधिकरणाला ३-० अशी धूळ चारली. महाराष्ट्रासाठी श्रुती मुंदडा, अलिशा नाईक यांनी एकेरीत, तर सिमरन सिंघी-रितिका ठाकेर यांनी दुहेरीत कमाल केली. श्रुतीने एकेरीच्या पहिल्या लढतीत तान्या हेमंतला २३-२१, २३-२५, २१-१८ असे संघर्षानंतर नमवले. त्यानंतर दुसऱ्या एकेरीच्या लढतीत अलिशाने मानसी सिंगवर २१-१८, १२-२१, २१-१९ अशी तीन गेममध्ये सरशी साधली. दुहेरीच्या लढतीत रितिका-सिमरन यांच्या जोडीने तान्या व प्रिया देवी यांना २१-१४, २१-१८ असे सहज नमवून महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पुरुष गटातील अंतिम सामन्यात विमानतळ प्राधिकरणाने कर्नाटकवर ३-० असे वर्चस्व गाजवले. तरुण मन्नेपल्ली, मैस्नम मैराबा यांनी एकेरीत, तर आलप मिश्रा-रविकृष्णा यांनी दुहेरीतील लढत जिंकून विमानतळ प्राधिकरणाचा विजय पक्का केला. बुधवारपासून एकेरीच्या लढतींना प्रारंभ होईल. यामध्ये लक्ष्य सेन, समीर वर्मा, आकर्शी कश्यप, अश्मिता छलिहा असे नावाजलेले बॅडमिंटनपटू खेळताना दिसतील.

logo
marathi.freepressjournal.in