राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी

स्पर्धेत सहा राज्यांतील १८० शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले.
राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी

बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सातपैकी पाच विजेतेपदांसह २६ पदके मिळवून महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राने १२ सुवर्ण, ७ रौप्य व ७ कांस्य अशा एकूण २६ पदकांची लयलूट केली. स्पर्धेत सहा राज्यांतील १८० शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले.

भिवंडीच्या वाजिद खानने ‘भारत सर्वश्रेष्ठ’ व ‘भारतश्री’, तर ठाण्याच्या खारेगाव येथील अपोलो जिमच्या जीवन सकपाळने ‘भारतकुमार’ किताब मिळविला. राम लाडने भारतकिशोर, तर संकेत पाटीलने भारतउदय किताब मिळविला.

दरम्यान, ठाण्यातील या यशस्वी शरीरसौष्ठवपटूंचा गौरव राज्य संघटनेचे अध्यक्ष कमलाकर पाटील, अभिनेते चिन्मय उदगीकर, व्यायामप्रेमी उद्योजक विवेक वैती, कार्यवाहक गिरीश शेट्टी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सहसचिव संतोष मलबारी यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in