7 sixes in an over : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विश्वविक्रमाला गवसणी; युवराज सिंगची करून दिली आठवण

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अनोखील कामगिरी करत जागतिक विश्वविक्रम केला आहे
7 sixes in an over : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विश्वविक्रमाला गवसणी; युवराज सिंगची करून दिली आठवण
@BCCIdomestic

मराठमोळा ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना एकाच ओव्हरमध्ये ७ षटकार मारले. यावेळी सर्वांनाच युवराज सिंगच्या ६ षटकारांची आठवण आली. पण, ऋतुराज हा एकाच ओव्हरमध्ये ७ षटकार मारणारा जगातला पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच, एकाच ओव्हरमध्ये ४३ धावा करणारादेखील तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ ६ षटकार मारून इतिहास रचला होता. त्यानंतर आता १५ वर्षांनी ऋतुराजने स्थानिक क्रिकेटमध्ये ७ षटकार मारत मोठा पराक्रम केला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात झालेल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यामध्ये ऋतुराजने १५९ चेंडूंचा सामना करत २२० धावांची तडाखेबाज खेळी केली. यामध्ये त्याने १० चौकार आणि १५ षटकारांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंह याच्या गोलंदाजीवर ऋतुराजने ही कामगिरी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in