झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात केला मोठा बदल;वॉशिंग्टन सुंदरच्या जागी 'या' खेळाडूची निवड

वॉशिंग्टन सुंदर वेगवेगळ्या फिटनेस समस्यांमुळे सुमारे १२ महिन्यांपासून अनेक वेळा संघाबाहेर पडला आहे
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात केला मोठा बदल;वॉशिंग्टन सुंदरच्या जागी 'या' खेळाडूची निवड

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. संघातील हा तिसरा बदल आहे. यावेळी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाझ अहमदचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

सुंदर हा इंग्लंडमध्ये गंभीर दुखापत झाली. ही स्पर्धा संपवून तो झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार होता. दुखापतीमुळे भारतीय संघातील स्थान त्याला गमवावे लागले आहे.

वॉशिंग्टन सुंदर वेगवेगळ्या फिटनेस समस्यांमुळे सुमारे १२ महिन्यांपासून अनेक वेळा संघाबाहेर पडला आहे. जानेवारीत त्याला कोरोनाची लागण झाल्याने तो संघाबाहेर झाला होता आणि आता पुन्हा त्याला दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणी संघाला आशिया चषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे; मात्र मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच संघात समावेश झालेला वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या शाहबाजला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सध्या क्रिकेटपटू असलेला शाहबाज अभियंता आहे. वडिलांच्या हट्टापायी त्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली आहे. शाहबाज २०२०पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील आणि आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. २७ वर्षीय शाहबाज अहमदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७.२८ सरासरीने धावा केल्या आहेत, तर त्याची गोलंदाजी सरासरी ३९.२० इतकी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in