टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता; 'या' खेळाडूची पुन्हा एन्ट्री होणार

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ११ सप्टेंबरनंतर टीम इंडिया जाहीर होण्याची शक्यता आहे
टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता; 'या' खेळाडूची पुन्हा एन्ट्री होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यात भारताचे सलग दोन पराभव झाले झाल्याने टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी मोहम्मद शमी टीम इंडियात परतणार आहे; मात्र वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल झपाट्याने बरा होत असून टी-२० विश्वचषकापूर्वी तो टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. आवेश खानच्या जागेवर दीपक चहरलाही स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ११ सप्टेंबरनंतर टीम इंडिया जाहीर होण्याची शक्यता आहे.

शमी गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा भाग होता; मात्र नुकत्याच झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये शमीला टीम इंडियात स्थान मिळाले नव्हते. आशिया कपमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे शमीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, बुमराहच्या पुनरागमन पक्के होईपर्यंत आम्ही त्याच्याविषयी कोणताही निर्णय घेणार नाही. या आठवड्यात बुमराह एनसीएमध्ये परतल्यानंतर त्याच्या दुखापतीची तपासणी केली जाईल. स्पष्ट कल्पना मिळाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. भारताला टी-२० विश्वचषकासाठी अनुभवी वेगवान गोलंदाजाची गरज आहे.

दरम्यान, युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल झपाट्याने बरा होत असून टी-२० विश्वचषकापूर्वी तो टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. जर बुमराह टी-२० विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त नसेल तर ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांसाठी शमी टीम इंडियामध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in