वेस्ट इंडिजमध्ये इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्टचा मृत्यू, स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना बुडाला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषकात समालोचन करणाऱ्या इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फय्याज अन्सारी...
वेस्ट इंडिजमध्ये इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्टचा मृत्यू, स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना बुडाला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषकात समालोचन करणाऱ्या इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फय्याज अन्सारी यांचा वेस्ट इंडिजमधील एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना (आंघोळ करताना) बुडून मृत्यू झाला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, फय्याज इरफान पठाणसोबत वेस्ट इंडिजमध्ये होता. इरफान पठाण स्वतः फय्याजचा मृतदेह घेऊन दिल्लीत येत आहे. नातेवाईकही दिल्लीला रवाना झालेत.

फय्याज काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथून मुंबईत आला होता आणि स्वतःचे सलून चालवत होता. याच दरम्यान एकदा इरफान पठाण त्याच्या सलूनमध्ये गेला. दोघांची ओळख झाली आणि कालांतराने फय्याज इरफानचा मेकअप आर्टिस्ट बनला.

शुक्रवार २१ जून रोजी सायंकाळी हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना (आंघोळ करताना) अचानक फैयाजचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती आम्हाला वेस्टइंडिजमधून मिळाली आहे, असे फय्याज अन्सारीचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद यांनी सांगितले. इरफान पठाण समालोचनासाठी सध्या वेस्ट इंडिजमध्ये असून तो फैयाजलाही सोबत घेऊन गेला होता. इरफानच फय्याजचा मृतदेह घेऊन दिल्लीत येत आहे. यानंतर नातेवाईक फय्याजचा मृतदेह नगीना, बिजनौर येथे आणतील. फय्याजच्या अचानक मृत्यूच्या बातमीने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in