
नवी दिल्ली : सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला गाशा गुंडाळावा लागला.
१,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांनी मलेशियाच्या एन अझियन आणि टॅन वीके यांना २१-१५, २१-१५ अशी धूळ चारली. त्यांनी ४३ मिनिटांत ही लढत जिंकली. आता सात्विक-चिरागपुढे यू सिग व ये टिओ या जोडीचे आव्हान असेल.
पुरुष एकेरीत चीनच्या ली शी फेंगने भारताच्या प्रणॉयला २१-८, १५-२१, २३-२१ असे तीन गेममध्ये नमवले. महिलांमध्ये मालविका बनसोड चीनच्या हॅन यूकडून १८-२१, ११-२१ अशी पराभूत झाली. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपिचंद, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या जोड्या पराभूत झाल्या.