मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

२०२६च्या बॅडमिंटन हंगामाला या १,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या स्पर्धेपासून प्रारंभ झाला. २०२५ या वर्षात भारताच्या फक्त दोन खेळाडूंनाच एखादी स्पर्धा जिंकता आली. त्यामुळे २०२६मध्ये कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
Published on

क्वालालंपूर : दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारी पी. व्ही. सिंधू आणि सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी गुरुवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र लक्ष्य सेनचे आ‌व्हान संपुष्टात आले.

२०२६च्या बॅडमिंटन हंगामाला या १,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या स्पर्धेपासून प्रारंभ झाला. २०२५ या वर्षात भारताच्या फक्त दोन खेळाडूंनाच एखादी स्पर्धा जिंकता आली. त्यामुळे २०२६मध्ये कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. महिला एकेरीत ३० वर्षीय सिंधूने जपानच्या नवव्या मानांकित टोमोका मियाझाकीला २१-८, २१-१३ अशी धूळ चारली. अवघ्या ३३ मिनिटांत ही लढत जिंकणाऱ्या सिंधूसमोर आता जपानच्या अकाने यामागुचीचे कडवे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीत जागतिक कांस्यपदक विजेत्या सात्विक-चिराग जोडीने जुनेद रौफ व रॉय किंग या मलेशियाच्या जोडीवर २१-१८, २१-१२ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. आता त्यांच्यासमोर इंडोनेशिया किंवा चायनीज तैपई यांच्यापैकी एका देशाच्या जोडीचे आव्हान असू शकते.

पुरुष एकेरीत अनुभवी लक्ष्य सेनला मात्र दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या लक्ष्यला हाँगकाँगच्या ल्यू च्यूककडून २०-२२, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच चीनच्या अग्रमानांकित शी यूने भारताच्या आयुष शेट्टीला १८-२१ २१-१२, २१-१२ असे पराभूत केले.

logo
marathi.freepressjournal.in