'त्या' निर्णयामुळे माझी कारकीर्द संपुष्टात आली, मनोज तिवारीचा धोनीवर निशाणा

वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावल्यानंतर तब्बल १४ सामने मला संधी लाभली नाही. त्या निर्णयामुळे माझी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली.
'त्या' निर्णयामुळे माझी कारकीर्द संपुष्टात आली, मनोज तिवारीचा धोनीवर निशाणा

बंगाल : वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावल्यानंतर तब्बल १४ सामने मला संधी लाभली नाही. त्या निर्णयामुळे माझी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मला नक्कीच हा प्रश्न विचारायला आवडेल, की मला संघातून का वगळण्यात आले?, असे स्पष्ट विधान भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने व्यक्त केले.

३८ वर्षीय मनोजने सोमवारी बंगालसाठी अखेरचा रणजी तसेच क्रिकेट सामना खेळला. मनोजने १२ एकदिवसीय व ३ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. कोलकाता येथे सौरव गांगुलीच्या उपस्थितीत मनोजचा तेथील क्रीडा पत्रकारांतर्फे खास सत्कार करण्यात आला.

“२०११मध्ये विंडीजविरुद्ध मी शतक झळकावले. तो मालिकेतील अखेरचा सामना होता. मात्र या सामन्यानंतर तब्बल १४ लढती मला संघाबाहेर बसावे लागले. त्यामुळे धोनीने तो निर्णय का घेतला, हा प्रश्न मला आजही भेडसावतो? माझ्यात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे कौशल्य होते. सध्या जेव्हा असंख्य खेळाडूंना अपयशी ठरूनही सातत्याने संधी मिळते. तेव्हा मला वाईट वाटते,” असे मनोज म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in