दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी रविवारी मॅरेथॉन

ही शर्यत १५ शहरांमध्ये एकाच वेळी सुरू होईल. मुंबईत गोरेगाव पश्चिम येथील बांगूर स्पोर्ट्स कॉम्पेक्स येथून धावण्याला प्रारंभ होईल.
दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी रविवारी मॅरेथॉन

मुंबई : ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसीजेस इंडिया (ओआरडीआय) यांच्यातर्फे रविवार, २५ फेब्रुवारी रोजी भारतातील दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी १५ शहरांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रेस फॉर ७’ असे या स्पर्धेचे नाव असून या अंतर्गत ७ किलोमीटरचे अंतर स्पर्धकांना धावावे लागणार आहे. दुर्मिळ आजारांबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुबीयांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संसाधनांची माहिती देणे व सक्षम करणे हा या मॅरेथॉनचा उद्देश आहे.

२०१६पासून ही मॅरेथॉन देशभरात आयोजित केली जाते. यंदा २० हजारांहून अधिक लोक यामध्ये सहभागी होतील. ही शर्यत १५ शहरांमध्ये एकाच वेळी सुरू होईल. मुंबईत गोरेगाव पश्चिम येथील बांगूर स्पोर्ट्स कॉम्पेक्स येथून धावण्याला प्रारंभ होईल. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती देण्याकरता मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेसाठी आयक्यूव्हीआयए दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित मुकीम आणि ‘ओआरडीआय’च्या संचालक संगीता बेर्डे उपस्थित होत्या. यावेळी स्पर्धेचे टी-शर्ट तसेच पदकाचे अनावरण करण्यात आले.

स्पर्धेविषयी महत्त्वाचे

नियमित धावपटूंसाठी नोंदणी शुल्क ६९९ रुपये आहे, तर विद्यार्थी ३९९ रुपयेच्या सवलतीच्या दराने नोंदणी करू शकतात.

दुर्मिळ आजाराचे रुग्ण आणि भिन्न क्षमता असलेल्या व्यक्ती, प्रत्येकी दोन काळजीवाहकांसह विनामूल्य सहभागी होऊ शकतात.

या श्रेणीतील सहभागींना एक टी-शर्ट, एक पदक, एक ई-प्रमाणपत्र आणि मानार्थ नाश्ता असलेले एक किट मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in