मॅरेथॉनपटू केल्विनचे कार अपघातात निधन

विश्वविक्रमवीर मॅरेथॉनपटू केल्विन किप्टम याचा रविवारी केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला. केल्विनने वयाच्या २४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
मॅरेथॉनपटू केल्विनचे कार अपघातात निधन

नैरोबी (केनिया) : विश्वविक्रमवीर मॅरेथॉनपटू केल्विन किप्टम याचा रविवारी केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला. केल्विनने वयाच्या २४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सिन्हुआच्या वृत्तानुसार, केल्विन याच्या कारमध्ये त्याचे प्रशिक्षक गेर्व्हाइस हकिझिमाना आणि आणखी एक महिला प्रवासीही होते. केल्विनच्या प्रशिक्षकांचाही कार अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमध्ये बसलेली एक महिला प्रवासी सध्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केल्विन किप्टम शनिवार, १० फेब्रुवारी रोजी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता पश्चिम केनियामधील कॅप्टेज ते एल्डोरेटला जात असताना त्यांची कार उलटली. पोलीस कमांडर पीटर मुलिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री ११ च्या सुमारास झाला. केल्विन कॅप्टेजहून एल्डोरेटकडे जात असताना त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली, यात किप्टम आणि त्याच्या प्रशिक्षकांचा दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केल्विनने शिकागो मॅरेथॉन २ तास ३५ सेकंदांच्या विश्वविक्रमी वेळेत जिंकली होती. जागतिक ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबास्टियन यांनी याविषयी शोक व्यक्त केला आहे. केल्विन यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार होता. त्याने शिकागो मॅरेथॉनमध्ये मातब्बर किपचोगेला नमवून अग्रस्थान पटकावले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in