लंडन : रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा आणि ब्रायन ब्रदर्स यांचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. २००६ मध्ये यूएस ओपन, २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपन अशी एकूण ५ ग्रैंड स्ल म जिंकण्याची मारिया कामगिरी शारापोव्हाने केली. डब्ल्यूटीएच्या एकेरीत प्रथम क्रमांकावर पोहोचणारी ती पहिली रशियन खेळाडू ठरली. २०२० मध्ये, वयाच्या ३२ व्या वर्षी तिने टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिने तब्बल १५ वर्षे आंतरराष्ट्रीय टेनिस कोट गाजवला.
दुसरीकडे, बॉब आणि माइक ब्रायन या जुळ्या बंधूंनी पुरुष दुहेरीत विक्रमी १६ ग्रँडस्लॅम जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच डबल्समध्ये सर्वाधिक वेळ प्रथम क्रमांकावर राहण्याची कामगिरी या जुळ्या बंधुंच्या नावावर आहे.