मार्टिन गुप्टिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम ; वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय

३५ वर्षीय गुप्टिलने आतापर्यंत १२१ सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ३ हजार ४९७ धावा आहेत.
 मार्टिन गुप्टिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम ; वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय
Published on

ब्रँडन किंग (३५ चेंडूंत ५३) आणि शामर ब्रुक (५९ चेंडूंत ५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळविला. विजयासाठीचे १४६ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने १९ षट्कांत २ बाद १५० धावा करीत साध्य केले; मात्र न्यूझीलंडने मालिका २-१ ने जिंकली.

दरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये धावा करण्याचा रोहित शर्माचा विक्रम न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज मार्टिन गुप्टिलने मोडला. त्यामुळे आता सर्वांधिक धावा करण्याच्या क्रमवारीत गुप्टिल टॉपवर आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने १३ चेंडूत १५ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने रोहित शर्माला मागे टाकत नवा विश्वविक्रम केला.

३५ वर्षीय गुप्टिलने आतापर्यंत १२१ सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर ३ हजार ४९७ धावा आहेत. रोहित शर्माच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार ४८७ धावा आहेत. त्यापाठोपाठ भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (३३०८ धावा), आयर्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार पॉल स्टर्लिंग (२९७५ धावा) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच (२८५५ धावा) यांचा क्रमांक आहे. कोहली २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये तीन हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

दरम्यान, रोहित आणि गुप्टिलने या दोघांच्या धावात जास्त अंतर नाही. त्यामुळे गुप्टिलन किती काळ नंबर वन राहतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in