
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेडला गुरुवारी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ३४ वर्षीय वेडने बुधवारी सायंकाळी कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने त्याला सध्या विलगीकरणात ठेवले आहे. मात्र शुक्रवारी सकाळी होणारी चाचणी नकारात्मक आल्यास तो इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळू शकेल, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. जर वेडला या दुखापतीतून माघार घ्यावी लागली, तर डेव्हिड वॉर्नर अथवा ग्लेन मॅक्सवेल यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने सांगितले.