मयांकला रुग्णालयातून डिस्चार्ज

भारताचा सलामीवीर तसेच कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवालला बुधवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
मयांकला रुग्णालयातून डिस्चार्ज
Published on

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर तसेच कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवालला बुधवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. आगरतळा ते सूरतच्या विमान प्रवासात प्रकृती बिघडल्याने त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ३२ वर्षीय मयांक हा रणजी स्पर्धेत कर्नाटकचे नेतृत्व करत आहे.

विमान प्रवासादरम्यान मयांक बाटलीबंद पेय प्यायला होता. त्यानंतर त्याला घशाचा त्रास जाणवू लागला. या बाटलीबंद पेयात हानीकारक पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. मयांकला आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, असे मयांकची पत्नी आशिताने मंगळवारी सांगितले होते. बुधवारी मयांक बंगळुरूसाठी रवाना झाला. कर्नाटकचा पुढील सामना २ फेब्रुवारीपासून रेल्वेविरोधात सूरतला होणार आहे. मात्र तो या लढतीसाठी अनुपलब्ध असेल.

‘‘मला आता फार बरे वाटत आहे. लवकरच मैदानात परतेन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबदल धन्यवाद,” असे ट्वीट मयांकने केले. यावेळी त्याने रुग्णालयातील बेडवरचे छायाचित्रही पोस्ट केले. मयांकच्या अनुपस्थितीत निकीन जोस कर्नाटकचे कर्णधारपद भूषवणार आहे. मयांकने २१ कसोटी व ५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in