एमसीएफ टफ मेन्सनी बीएसएएम बिलियर्ड्स लीगची ट्रॉफी उंचावली

चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या एमसीएफचे हे पहिलेच जेतेपद ठरले.
एमसीएफ टफ मेन्सनी बीएसएएम बिलियर्ड्स लीगची ट्रॉफी उंचावली

यजमान क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सीसीआय बिलियर्ड्स बॉईज टीमला ४३१-२७० असे हरवत मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या एमसीएफ टफ मेन्सनी सीसीआय-केकू निकोल्सन बीएसएएम बिलियर्ड्स लीगची ट्रॉफी उंचावली. चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या एमसीएफचे हे पहिलेच जेतेपद ठरले.

सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी एमसीएफने प्रतिस्पर्धी सीसीआय क्लबवर पूर्णपणे वर्चस्व राखले. अनुभवी चंदू कंसोडारिया आणि रोहन जंबासुरीया हे त्यांच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले. त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या पायावर अक्षय गोगरी याने कळस चढवला. सीसीआय बिलियर्ड्स बॉईज +११० हँडीकॅप आणि सीसीआय टफ मेन्स -३५ गुणांसह खेळले. त्यामुळे कंबाईन हँडीकॅप १४५ गुणांची होती; मात्र सीसीआयला अपेक्षित खेळ करता आला नाही. एमसीएफच्या कंसोडारियाने दमदार सुरुवात करताना ८४ गुणांचा ब्रेक करताना सतबीर नरूला (+५०) याच्यावर २००-४८ अशी सहज मात केली. त्यानंतर दुसऱ्या फ्रेममध्ये जंबासुरीया याने (-६०) प्रतिस्पर्धी हसन बदामी (-२०) याच्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले.

जंबासुरीया याने याने ५७, ७३ आणि ४१ असे ब्रेक मारताना २००-७३ असा विजय मिळविला. तसेच एमसीएफची आघाडी वाढवली. दुसऱ्या ब्रेकनंतरच्या १३४ गुणांच्या आघाडीनंतर गोगरी (+२५) याने विजयासाठीचे उर्वरित सोपस्कार पूर्ण केले. त्याने गिरीराज गंगलानी याला (+८०) ६६-३९ असे नमविले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in