टेबलटेनिसमध्ये पुरुष संघाने पटाकवले सुवर्णपदक; भारताची सुवर्णपदकांची संख्या पोहचली पाचवर

टेबल टेनिस पुरुष सांघिक संघाने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील सुवर्णपदक जिंकले होते
 टेबलटेनिसमध्ये पुरुष संघाने पटाकवले सुवर्णपदक; भारताची सुवर्णपदकांची संख्या पोहचली पाचवर

भारतीय टेबलटेनिस पुरुष संघाने सिंगापूरचा ३-१ असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या बरोबरच भारताची सुवर्णपदकांची संख्या ही पाचपर्यंत पोहोचली.

टेबल टेनिस पुरुष सांघिक संघाने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील सुवर्णपदक जिंकले होते. सिंगापूर विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा भारताने सांघिक प्रकारात सिंगापूरला मात दिली; मात्र एकेरीच्या पहिल्या सामन्यात अचंता पराभूत झाला. त्यानंतर सत्येन गणसेकरन आणि हरमीत देसाईने आपल्या एकेरीचे सामने जिंकत सिंगापूरचे आव्हान संपुष्टात आणले. क्रीडा ११ दुहेरीच्या सामन्यात हरमीत देसाई आणि जी. साथियान यांनी विजय मिळवित भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. च्यु झे यू क्लेरेन्सने पुढील गेम जिंकून सिंगापूरला १-१ असे बरोबरीत आणले होते; पण जी. साथियान आणि हरमीत देसाई यांनी आपापले वैयक्तिक सामने जिंकून भारताचे सुवर्णपदक पक्के केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in