IPL 2026 : तळाचे स्थान टाळण्यासाठी मुंबई-लखनऊमध्ये लढत

आयपीएलमध्ये सोमवारी होणाऱ्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात गुणतालिकेतील तळाचे स्थान टाळण्यासाठी द्वंद्व पाहायला मिळेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येतील.
IPL 2026 : तळाचे स्थान टाळण्यासाठी मुंबई-लखनऊमध्ये लढत
IPL 2026 : तळाचे स्थान टाळण्यासाठी मुंबई-लखनऊमध्ये लढत
Published on

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी होणाऱ्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात गुणतालिकेतील तळाचे स्थान टाळण्यासाठी द्वंद्व पाहायला मिळेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येतील.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर २८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. आता स्पर्धा साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे. मुंबई-लखनऊ मात्र गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या आणि १०व्या स्थानी आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने ९ पैकी २ लढती जिंकल्या आहेत. त्यातही वानखेडेवर मुंबईला सलग चार सामने गमवावे लागले आहेत. तसेच गेल्या तीन सामन्यांत मुंबई पराभऊत झाली आहे. एकूणच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान जर-तरवर टिकून आहे. रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व हार्दिक यांनीही सातत्याने निराशा केली आहे. रायन रिकल्टन व नमन धीर यांच्यावरच प्रामुख्याने फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराला सूर गवसला आहे. तसेच फिरकीपटू अल्लाह गझनफर कमाल करत आहे. मात्र एकंदर सांघिक कामगिरीत मुंबई अपयशी ठरत आहे. मुंबईने मार्च महिन्यात कोलकाताविरुद्ध, तर एप्रिल महिन्यात गुजरातविरुद्ध असे दोनच विजय आतापर्यंत मिळवले आहेत.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊची कहाणीसुद्धा काहीशी सारखीच आहे. आठ पैकी फक्त २ सामने जिंकणाऱ्या लखनऊला बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित सहा लढती जिंकून अन्य संघांच्या कामगिरीवरही विसंबून रहावे लागेल. जोश इंग्लिस या लढतीसाठी लखनऊच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मात्र पंतसह निकोलस पूरन, मिचेल मार्श यांचे अपयश संघाला सतावत आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, मोहसिन खान व प्रिन्स यादव यांचे त्रिकुट छाप पाडत आहे. आता जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर लखनऊचा संघ मैदानात परतणार आहे. त्यामुळे ते विजयपथावर परतण्यास उत्सुक असतील.

प्रतिस्पर्धी संघ

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत, केशव महाराज.

logo
marathi.freepressjournal.in