मीराबाईचा सुवर्ण विजय;भारताला वेटलिफ्टिंगमध्ये एकाच दिवशी तिहेरी पदकांची कमाई

सलग दोन स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिलीच वेटलिफ्टिंगपटू ठरली आहे.
मीराबाईचा सुवर्ण विजय;भारताला वेटलिफ्टिंगमध्ये एकाच दिवशी तिहेरी पदकांची कमाई
Published on

मणिपूरच्या पोलादी मीराने एकूण २०१ किलो (८८ आणि ११३) वजन उचलून महिलांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्येही मीराने सुवर्ण जिंकले होते. सलग दोन स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिलीच वेटलिफ्टिंगपटू ठरली आहे. मीराबाईने स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८४ किलो वजन उचलले. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने ८८ किलो वजन उचलून आघाडी घेतली. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिला किमान ८७ किलो वजन उचलणे गरजेचे होते. परंतु तिने थेट १०९ किलो वजन यशस्वीरीत्या उचलून सुवर्णपदक पक्के केले. यावरही ती थांबली नाही. तिने दुसऱ्या प्रयत्नात ११३ किलो उचलून स्पर्धा विक्रम रचला. वेटलिफ्टिंगमध्ये दोन्ही प्रकारांत खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी ग्राह्य धरली जाते.

logo
marathi.freepressjournal.in