नितीश राणाच्या पत्नीला आला भयानक अनुभव ; दोन तरुणांनी केला पाठलाग आणि...

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा यांच्या पत्नीच्या गाडीचा दिल्लीत दोन तरुणांनी पाठलाग
नितीश राणाच्या पत्नीला आला भयानक अनुभव ; दोन तरुणांनी केला पाठलाग आणि...

दिल्लीमधील महिला असुरक्षित असतानाच्या अनेक बातम्या आपल्या समोर येतच असतात. मात्र अशातच आता भारतासाठी खेळणाऱ्या एका खेळाडूच्या पत्नीला देखील असाच काहीसा अनुभव दिल्लीमध्ये आला. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाच्या पत्नीच्या गाडीचा दिल्लीत दोन तरुणांनी पाठलाग केला. नितीश राणाची पत्नी साची मारवाहने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून संपूर्ण घटना शेअर केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. दिल्ली पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत एका तरुणाला अटक केली आहे. 

कामावरून घरी येत असताना नितीश राणा यांच्या पत्नीचा दोन तरुणांनी पाठलाग केला. साची मारवाहने दिल्लीतील क्रांतीनगर येथील फोटो पोस्ट केला आहे. दिल्ली पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश राणा यांची पत्नी साची मारवाह काम आटोपून घरी जात होत्या. त्यावेळी दिल्लीतील क्रांतीनगर येथे दुचाकीवरून दोन तरुणांनी त्याचा पाठलाग केला. पाठलाग करण्यासोबतच कारचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला. साची मारवाहने धैर्याने लढा दिला. तिने मोबाईलमध्ये तरुणाचे फोटो काढले. त्यानंतर सोशल मीडियावर आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली. तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर साची मारवाहने थेट पोलीस ठाणे गाठले. तिने दिल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तत्काळ कारवाईची विनंती केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in