IPL 2026 : स्टार्क, पथिराना यांचेही आगमन आता विलंबाने

आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंची स्पर्धेतून माघार घेण्याची किंवा विविध कारणास्तव उशिराने भारतात दाखल होण्याची मालिका शुक्रवारीही कायम राहिली. आता यामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्क व कोलकाताकडून खेळणारा श्रीलंकेचा मथीशा पथिराना यांची भर पडली आहे.
IPL 2026 : स्टार्क, पथिराना यांचेही आगमन आता विलंबाने
IPL 2026 : स्टार्क, पथिराना यांचेही आगमन आता विलंबाने
Published on

नवी दिल्ली: आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंची स्पर्धेतून माघार घेण्याची किंवा विविध कारणास्तव उशिराने भारतात दाखल होण्याची मालिका शुक्रवारीही कायम राहिली. आता यामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्क व कोलकाताकडून खेळणारा श्रीलंकेचा मथीशा पथिराना यांची भर पडली आहे.

२८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. विराट कोहलीचा समावेश असलेला व रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. तूर्तास फक्त १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करणार आहे.

दरम्यान, स्टार्कला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो ५ ते १० एप्रिलमध्ये भारतात दाखल होईल, असे समजते. त्यामुळे दिल्ली संघाचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे कोलकाताने यंदा लिलावात खरेदी केलेल्या श्रीलंकन पथिरानाला पायाच्या दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकावे लागले होते. पथिराना एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात येईल, असे समजते. कोलकाताचा हर्षित राणा, चेन्नईचा टी-२० नॅथन एलिस, राजस्थानचा सॅम करन हे खेळाडू आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in