IPL 2026 : मिचेल स्टार्क पुनरागमनासाठी सज्ज

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.
IPL 2026 : मिचेल स्टार्क पुनरागमनासाठी सज्ज
IPL 2026 : मिचेल स्टार्क पुनरागमनासाठी सज्ज
Published on

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. आता स्टार्क पुनरागमनासाठी सज्ज झाला असून तो १ मे रोजी होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

कोपर आणि खांद्याच्या दुखापतीमुळे जानेवारीपासून स्टार्क क्रिकेटपासून दूर होता. ‘ॲशेस’ मालिकेतील पाचही कसोटी सामन्यांत महत्त्वाची भूमिका बजावत त्याने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला होता. त्यानंतर तो सिडनी सिक्सर्सकडून ‘बिग बॅश लीग’चे पाच सामने खेळला होता. स्टार्क सध्या सरावात असून १ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या सामन्यातून तो या हंगामात पदार्पण करण्यास सज्ज आहे.

“आपल्या दुखापतीचे गांभीर्य माहीत नसतानाही काही व्यक्तींनी चुकीची माहिती पसरवली,” असा आरोप स्टार्कने केला आहे. स्टार्कने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी ११ सामन्यांत १४ बळी घेतले होते.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या सहा सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा सनरायझर्स हैदराबादकडून, तर जोश हेझलवूड हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in